खात्यातले शिपाई दिवाळी जवळ आली की कुठल्यातरी नाक्यावर उभे राहून गाड्या अडवून दादागिरी करून पैसे उकळतात. अशा एका टोळीच्या दुर्दैवाने मला मध्ये एका आड ठिकाणी काम होते म्हणून मी कंपनीच्या मालाच्या टेंपोतून चाललो असतांना टेंपो अडवला. मी अडवणाराकडे ओळखपत्र मागितले तर आवाज चढवून घाबरवायचा प्रयत्न केला. कोणत्या कायद्याखाली आणि नियमाखाली तू तपासणी करतो आहेस त्या कायद्याचे फक्त शीर्षक सांग म्हटले तेव्हा त्याला सांगता येईना. शेवटी तोतया म्हणून मीच तुम्हा सगळ्यांना पकडून देतो आणि तुरुंगात टाकतो म्हटल्यावर सगळे पसार झाले. नंतर त्यापैकी एक आमच्याच
कारखान्यात दिवाळी मागायला आला होता.
पैसे उकळण्यासाठी अधिकार नसतांना तपासणी करणे, अधिकारक्षेत्राच्या बाहेर तपासणी करणे वगैरे प्रकार मुंबईत सर्रास चालतात. व्यापारी, कारखानदार, काही वेळा कंपनीतले अधिकारी पण कर चुकवून माल गुपचुप विकतात. पण खोटे कागदपत्र त्यांच्याकडे तयार असल्यामुळे पकडले जात नाहीत. खरे अधिकारी देखील त्यांचे फारसे वाकडे करू शकत नाहीत. सध्या चोरांची काही प्रमाणात का होईना पण चलती आहे हे खरे.