चर्चा गुऱ्हाळ चालू करून ही ईमली कुठे गेली ?
असो, की तसच मन मारत जगावे ह्याचा नक्की अपेक्षित अर्थ काय आहे ते समजल्यास बरे होईल..... कारण मन कोणत्या गोष्टीसाठी मारत आहत त्यावर ठरवता येते की मरू द्यायचे का नाही ते... लग्नानंतर चे आयुष्य आणि लग्नापुर्वीचे ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे... आणी तो तसाच असणे अपेक्षित आहे...
आणि जोडीदार मान्य का करत नाही ते देखिल शोधायला हवे => नवऱ्याने बायकोचा अथवा बायकोने नवऱ्याचा... मैत्रिण/मित्र हा,
१) मित्र/मैत्रिण म्हणूनच पुढे आला पाहिजे, आणि तिने/त्याने योग्य अंतर बाळगणे आवश्यक आहे.
२) खऱ्या मित्रांना उगिच मानलेला भाउ, मानलेली बहिण असली वायफळ कारणे देऊन नाते जोडण्याची गरज नसते...त्याने संशय वाढतो..
३) लग्न झाल्यावर आपला जोडीदार हा आपली पहिली मैत्रिण/मित्र असला पाहिजे... तस झाल तर उत्तमच पण नाहीच झालं, तर मग जोडीदाराचे मित्र/मैत्रीणीवरचे ऑब्जेक्षन (निर्बंध) बिनशर्त मानता यायला हवेत.... तुला नाही आवडतं ना तिच्याशी बोललेलं... ठीक आहे.... मग मी नाही बोलणार.... ! (कारण ९५% वेळा आयुष्यभर तुमचा लग्नाचा जोडीदार तुमच्यासोबत शेवटपर्यंत असतो... तरच संसार सुखाचा हे मर्म जाणता येऊ शकते... !)
बाकी ज्याचा त्याचा प्रश्न ! ( कोणत्याही बाबतीत ८०-% चांगले आणि २०% वाईट अनुभव असतातच...)
जोडीदार - फक्त एका फ्रेम ऑफ रेफरन्स मधून पाहत नाही तर, तो सर्वांगिण विचार करतो..
पण मित्र/मैत्रीण हे फक्त '३र्ड पार्टी' पर्स्पेक्टिव मध्ये असल्याकारणाने तोंडपुजेपणाची शक्यता नाकारता येत नाही ! आणि म्हणुनच तुमच्या हो ला हो, नाही ला नाही, आणि तुमची स्तुती करण्यासाठी कमी कष्ट घेतले जातात तरी तुम्हाला वाटतं की हा किंवा ही आपल्या जोडीदारापेक्षा किती चांगला आहे ? (ही शोकांतिकाच...)
आणि 'लग्न संस्कार' ह्या व्याख्येतच समजून येते की लग्नानंतर हे जीवन हे जास्त जबाबदारीचे असते... कारण कोणताही संस्कार केला गेला, कि जबाबदारी वाढतेच नाही का ?
-
आशुतोष दीक्षित.