साबुदाणा खिचडीच्या जातकुळीत ही पाककृती सरकवण्यासाठी काही अजून करता येऊ शकेल.
(१) फोडणीला तेलाऐवजी साजूक तूप
(२) फोडणीतून मोहरी हद्दपार
(३) ओल्या खोबऱ्याचा यथायोग्य वापर (कोंकणात ओल्या खोबऱ्याशिवाय साबुदाणा खिचडी ही कल्पना अवघड आहे).

अवांतर - भिजवलेल्या साबुदाण्याऐवजी मोकळा करून घेतलेला शिळा भात घातला तर सुरेख 'खिचडी'भात होतो.