'उजवा हात डोक्याच्या मागून घेऊन नाक पकडणे' या क्रियेला द्राविडी प्राणायाम म्हणतात असे ऐकले आहे. हे अत्यंत अवघड असते. म्हणजेच एखादी गोष्ट करण्यास सोपा मार्ग उपलब्ध असताना अत्यंत अवघड मार्गाने ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे या अर्थी 'द्राविडी प्राणायाम' हा शब्दप्रयोग करण्यात येतो.