"आपली कविता सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी निवडली गेली आहे"..... इ-मेल वरचा हा मजकूर वाचला आणि यावेळी कोणती भावाना मनात उमटली, हे नक्की सांगता येण्यासाराख नव्हत. पण कविता विश्वातला आपला प्रवास... किती... कसा.... आणि केव्हापासून याचा शोध लावन्याचा प्रयत्न सुरू झाला. आता आठवत कविता लिहिली तर जायची पण तिला वाचकच मिळत नसे. याहून ती वाचली न गेल्यामुळे, इरतांचे मत, टिका, सल्ले यासारख्या कविता फुलवनार्या, घडवनार्या गोष्टींपासून मी कितीतरी दूर होतो. हे सुरू असताना या कवितेंच्या प्रवासात दोन साथीदार मिळाले आणि अर्थातच ते म्हणजे "मराठी कविता" आणि "अंकुर अक्षरांचे". कविता खुलने, फुलने हे तर झालच पण कविता उमलली तिही इथेच.
             आज इथपर्यंतचा प्रवास पाहता, आठवून जातात ते इथे विसावलेले नवकवी, त्यांच्या कविता, आणि तुम्हा लोकांकडून मिळालेली दाद, प्रोत्साहन, दिलेले सल्ले, केलेल्या टिका. "कवी" या असाधारन व्यक्तीकडे म्हणू किवा या संकल्पनेकडे जो प्रवास सुरू झालेला आहे तिथपर्यंत पोहचू किवा नाही हे माहित नाही. पण या प्रवासाची पाउलवाट निर्माण करून दिली ती"अंकुर अक्षरांचे" नेच. "अक्षर अंकुर" चे आजपर्यतचे सर्वच भाग, त्याचे विषय, निवडलेल्या कविता हे सर्व कौतुकास्पद आहे. हि कवितेची वेल अशीच फुलत जावी, इथे नवनवीन फुल अशीच बहरत जावीत आणि तीच संगोपन अशाचप्रकारे भविष्यात पण केल जाव हिच प्रार्थना.....