तसे तर हिंदी चित्रपटात एकच गीत (किंवा एकाच चालीची दोन गीते)वेगवेगळ्या
प्रसंगी - एक दुःखी आणि एक आनंदी -, वेगवेगळ्या गायकांनी गायिली असल्याची
अनेक उदाहरणे सापडतील.
हो, आणि सिलोन किंवा विविध भारतीवर अशा गाण्यांचा 'दो पहलूवाले गीत' असा एक कार्यक्रमसुद्धा होता असे ओझरते आठवत आहे. पण 'अनेकावृत्त' मध्ये विनायकांना हे अभिप्रेत नसावे.