लतापुष्पा

मीराताई म्हणतात त्याप्रमाणे दोन वेगळ्या मूडस मधली पुरुष आणि स्त्री यांच्या आवाजातली अनेक गाणी आहेत, ती मला इथे अभिप्रेत नाहीत.  श्री. कुशाग्र यांनी श्रद्धांजली म्हणून  इतर गायकांनी गायलेल्या गाण्यांना "अनेकावृत्त" म्हणता येईल का असे विचारले आहे. माझ्या मते नाही. आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे स्वतः संगीतकार हौस म्हणूने मूळ दुसऱ्या गायक/गायिकेने गायलेले एखादे प्रसिद्ध  गाणे एखाद्या कार्यक्रमात गातात.

उदा. सुधीर फडक्यांच्या आवाजात ज्योति कलश छलके, किंवा सी. रामचंद्रांच्या आवाजात आधा है चंद्रमा, किंवा मुहब्बत ऐसी धडकन है, पण ही व्हर्जन साँग्ज नव्हेत. अर्थात ती तशी असली किंवा नसली तरी गाण्याच्या आस्वादात कमतरता येत  नाही.

विनायक