पेठकर,
भूक नव्हतीच पण 'तुटून पडा' म्हटल्यावर आपोआप भूक लागली.
हा हा हा. हे वाक्य खूप आवडले.
आपण कथा खूप छान लिहिली आहे. प्रतिसादण्यासारखे अनेक मुद्दे वरती चर्चून झालेले दिसतात म्हणून एक वेगळाच विचार मनात आला तेवढाच आम्ही मांडतो.
आमच्या मते ही एक रूपककथा आहे. शर्वरी ही म्हटली तर आधुनिक, म्हटली तर पारंपरिक अशी मुंबई नगरी आहे. बिचारा मराठमोळा शशांक तिच्यावर मनापासून प्रेम करतो परंतु धंद्यात मुरलेल्या पटेल गुजराथ्यापुढे त्याचा निभाव लागत नाही. गुजराथी आपले वर्चस्व मुंबईवर प्रस्थापित करतो असा हा करुण शेवट आहे. चू भू द्या घ्या.
पुन्हा एकदा काळजाला भिडणारी कथा लिहिल्याबद्दल आपले आभार व अभिनंदन!
आपला
(अर्थशोधक) प्रवासी