इतिहासकार दत्तो वामन पोतदार आणि न. र. फाटक तसेच संतवाङमयाचे अभ्यासक गं. बा. सरदार संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत.
त्यातही न. र. फाटकांनी तक्रार केली होती "मी आणि पोतदार केवळ एकेक पुस्तक लिहून संमेलनाचे अध्यक्ष झालो हे योग्य नाही. निदान माझे पुस्तक मी स्वतः लिहिले होते, पोतदारांचे मात्र दुसऱ्याने लिहिले होते. " यातले खरेखोटे माहिती नाही. विश्राम बेडेकर फक्त "रणांगण" आणि "एक झाड दोन पक्षी" या दोन पुस्तकांच्या बळावर अध्यक्ष झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही लौकिक अर्थाने कथा - कादंबरीकार म्हणता येणार नाही. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या तरी त्या ऐतिहासिक आणि विशिष्ट उद्देश्याने लिहिल्या. ग्रंथकारांचे पहिले संमेलनही बहुतेक (इथे चूभूदेघे) न्यायमूर्ती रानड्यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. तसेच एका संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज होते, त्यांनी कसलीही साहित्यनिर्मिती केली नव्हती. (इथेही चूभूदेघे).
विनायक