हा तर कोणत्याही साहित्याचा ललामभूत दागिना आहे. साहित्याचं चौखूर उधळणारं वारू समीक्षेमुळेच तर गुणवत्तेच्या, साचे- बद्धतेच्या चौकटीत राहतं. आणि संमेलनांचे उद्दिष्ट (काही ठरवायचे झाल्यास) हे केवळ जनसामान्यांचे रंजन करणे एव्हढेच मर्यादित नसून, साहित्याला नव्या दिशा देणे, बदलत्या समाजिकतेचे प्रतिबिंब साहित्यात उमटते आहे किंवा नाही याचा धांडोळा घेणे, भाषेला प्रवाही, उर्जितावस्था प्राप्त करून देणे हेही असते. आणि ही कामं समीक्षा निश्चितपणे करत असतेच की.
किंबहुना, सृजनात्मक साहित्यनिर्मितीचा समीक्षा हा एक महत्त्वाचा पाडाव आहे. गुणवत्तेचा, बांधीवतेचा, नियमांचा आग्रह धरणारी समीक्षा नसेल तर ती 'नव' निर्मिती काय असेल त्याची कल्पनाही करता येत नाही.
'क्वालिटी डिपार्टमेंट' हे कुठल्याही ऑरगनायझेशनचे महत्त्वाचे अंग आहे. 'साहित्य' त्याला अपवाद कसे ठरणार बरे?