हे जर कळलं तर मग परिक्रमेची गरजच नाही कारण तुम्ही शरीरापासून वेगळे आहात हे तुम्हाला समजलं. आता कुठे गेलात काय आणि नाही काय तुम्ही शरीरापासून वेगळेच राहणार.

आता राहिला मनाचा प्रश्न! ‘अनुभवाचा सोस’ हीच तर मनाची किमया आहे. कुणाला वाटतंय संपत्तीत मजाय, कुणाला सत्तेचा कैफ आहे, कुणाला अमका विक्रम करायचायं तर कुणाला तमका विक्रम मोडायचायं, कुणी रतीमग्न आहे तर कुणाला विविध आध्यात्मिक अनुभव हवेत. पण एकच गोष्ट लक्षात आली की सगळा विषयच संपणार आहे आणि ती म्हणजे प्रत्येक अनुभवात, अनुभवणारा एक आहे आणि तो निराकार असल्यानं कोणत्याही अनुभवानं निर्लिप्त आहे, झालं काम!

संजय