कलम, टाक हे शब्द हल्ली कमीच वापरले जातात हे खरे आहे. त्यांना 'पेन'ने बोली व लेखी मराठीतून जवळ जवळ हद्दपार केल्यासारखेच आहे. हा विचार मनात आला, व थोड्या वेळाने 'टाक' शब्दासहित काही ओळी सुचल्या. त्या इथे वाचू शकता. (तेव्हढाच शब्दसंवर्धनाच्या कार्यात माझा खारीचा वाटा.
)
अवांतर : हल्ली मटात काय किंवा लोकसत्तात काय, (किंबहुना कोणत्याही वृत्तपत्रात), छापून आलेला मजकूर भाषिक दृष्ट्या अचूक असणारच असे मानण्याचे दिवस राहिलेले नाहीत. विशेषतः मटाने तर प्रमाण मराठीशी असलेली आपली नाळ कधीच तोडून टाकली आहे. इथल्या इंग्रजी वृत्तपत्रांची गतही वेगळी नाही. इंग्रजी शिकायची असेल, सुधारायची असेल तर टाईम्स वाच, असे एके काळी सांगितले जायचे. हल्ली, इंग्रजीवर उजळ माथ्याने, राजरोसपणे बलात्कार कसा करायचा हे शिकायचे असेल तर टाईम्स, हिंदुस्तान टाईम्स, इंडियन एक्सप्रेस इत्यादी वाचा असे सांगण्याचे दिवस आले आहेत. "कालाय तस्मै नमः"...