एखाद्या साहित्यकृतीत सहज न दिसणारे सौंदर्य उलगडून दाखवण्याचे काम देखील समीक्षकाचेच असते. समीक्षक हा साहित्यिक असू शकत नाही हे विधान बहुतांशी बरोबर असले तरी शंभर टक्के बरोबर नाही. कारण या विधानाचा व्यत्यास सत्य नाही. अपवादात्मक रीत्या काही साहित्यिक मात्र उत्तम समीक्षक असू शकतात. उदा. विजया राजाध्यक्ष. साहित्यिक म्हणून त्यांचे स्थान बरेच उच्च आहे. त्यांनी जी. ए. आणि आणखी एकदोन साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे सुरेख मूल्यमापन केलेले आहे. त्या कधी संमेलनाध्यक्षा होत्याकी नाही ठाऊक नाही. उद्या त्या संमेलनाध्यक्षा झाल्या तर निदान रसिकांचा तरी त्याला फारसा विरोध असणार नाही. पुल साहित्यिक होते हे बहुतेक जण मान्य करतातच. नी वेळॉवेळी बोरकरांच्या कवितांची जरी समीक्षा म्हणता येणार नाही तरी समीक्षेच्या जवळ जाणारी रसग्रहणे केलेली आहेत. पुलसुनीतांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम ज्यांनी अनुभवला आहे ते नक्कीच हे मान्य करतील.
पण केवळ समीक्षकांनी अध्यक्षपद भूषवू नये असेच माझे वैयक्तिक मत आहे. साहित्य समेलनाच्या अध्यक्षाने प्रथम साहित्यिक असणे अभिप्रेत आहे.
दुसरा पण जास्त महत्त्वाचा मुद्दा हा ठरेल की साहित्य परिषद/महामंडळ जे काही असेल त्या परिषदेवर/महामंडळावर समाजाला जीवनमूल्यांची जाणीव करून देणारे, अभिजात साहित्यिकच असावेत. माझ्यासारखे केवळ कुठेतरी काहीतरी खरवडणारे नसावेत.