साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिकालाच मिळावे असे मला वाटते‌ .साहित्यिकाने किती साहित्यनिर्मिती केली हा निकष महत्त्वाचा नाही. एकादीच चांगली साहित्यकृती निर्माण करून त्या व्यक्तीस साहित्यिक हे बिरुद मिरवता येते किंवा भाराभर पुस्तके लिहूनही त्या व्यक्तीस साहित्यिक म्हणणे अवघड जाते‌. साहित्यबाह्य निकष लावून बडोद्याच्या महाराजांसारखे अध्यक्ष झालेही असतील पण त्या काळात आजच्याइतकी स्पर्धा नव्हती. समीक्षक असून स्वतंत्र साहित्यनिर्मिती ( उदा. विजया राजाध्यक्ष )केलेल्या व्यक्तीस अवश्य अध्यक्षपद मिळावे पण केवळ समीक्षक असूनही त्याना अध्यक्षपद मिळणे हे स्वतंत्र साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांवर अन्यायकारक आहे. त्यातही अलीकडे समीक्षकांनाच अध्यक्षपदे अधिक वेळा मिळाली आहेत.