"साहित्याची समीक्षा लिहिली जाते" असे प्रमेय मांडल्यास, "ज्या लिखित मजकुराची समीक्षा लिहिली जाते ते साहित्य" असा व्यत्यास मांडता येईल.
असे झाले तर समीक्षा ही देखील साहित्यप्रकारात सामावली जाईल. ह्याला कारण असे की समीक्षावाङ्मयाचीही समीक्षा लिहिली जाऊ शकते.

आता तपशील लक्षात नाही पण १९७९-८० च्या सुमारास "विविध कालावधीतील मराठी समीक्षाग्रंथांचा प्रवास .... " अशा काहीशा नावाचे मराठी समीक्षावाङ्मयाची समीक्षा करणारे पुस्तक प्रकाशित झालेले होते (... आणि त्या पुस्तकाची समीक्षा वर्तमानपत्रात आलेली होती... ती मी वाचली )
समीक्षाग्रंथांवर समीक्षा झाली म्हणजे मूळ समीक्षाग्रंथ हे 'साहित्य' होते असे समजायला हरकत नाही.!