मला वाटते की एक अडिशेरी म्हणजे वजनी अडीच शेर परंतु मापी दोन शेर. पायली हे माप होते आणि पासरी हे वजन, हे वर आलेच आहे. मण आणि खंडी ही एकके वजनांत आणि मापांतही होती हेही वर आले आहे. मापटे, चिपटे, कोळवे, निळवे येऊन गेले, पण निठवे आले नाही.
मापटे(= मापी अर्धा शेर) म्हणजेच निठवे. म्हणजे, एक निठवे = ८ निळवे.
याशिवाय टाक नावाचे एक वजन/माप होते. ९ मासे = १ टाक. १ नवटाक(म्हणजे ९ टाक) = अर्धा पावशेर. ८ नवटाक = ७२ टाक = १ शेर. अर्थात हा शेर, ८० तोळ्याच्या पक्क्या शेरापेक्षा लहान होता.
गुंज किंवा रत्तीपेक्षा हलके वजन होते. ३ बार्लीचे दाणे किंवा ४ तांदळाचे दाणे म्हणजे एका गुंजेचे वजन. म्हणून ४ धान = १ रत्ती(गुंज) आणि
६ गुंजा = १ आणा.
याशिवाय मुंबई बाजारात पुढील वजने चालत. : ४ सिकी = १ तोळा; ५ सिकी= १ कांचा; ४ कांचा=१ छटाक.
बंगाली वजने आणखी वेगळीच होती. ५ छटाक= १ कुंक; २ कुंक = १ खुंची; २ खुंची = १ रेक; २ रेक =१पाली; २ पाली = १ दोण; २ दोण = १ काटी; ८ काटी= १अरबी; २० अरबी = १ बिश; १६ बिशी = १ कहान.
१६ पाली = १ मण; ८ दोण=१मण; ३२ रेक = १ मण; २० दोण =१ साली. वगैरे.