'चितगांव' हे त्या शहराचे अधिकृत बांग्ला (बंगाली) नावही नाही ('चट्टग्राम' आहे), किंवा (अपभ्रष्ट का होईना, पण) अधिकृत/प्रचलित/पारंपरिक इंग्रजी रूपही नाही ('चिटगाँग' आहे). 'चितगांव' हा (केला असलाच तर) बहुधा मराठी वृत्तपत्रांनी (ओढूनताणून, बहुधा अज्ञानापोटी (चूभूद्याघ्या)) केलेला अपभ्रंशाचा अपभ्रंश वाटतो, म्हणून खटकते, इतकेच. ('चितगांव' हे त्या शहराच्या नावाचे मराठीतील पारंपरिक अथवा प्रचलित रूप वगैरे असण्याइतका त्या शहराचा वारंवार उल्लेख मराठीत होत अथवा कधीकाळी झाला असण्याबाबत साशंक आहे. 'कोलकाता'ऐवजी 'कलकत्ता' हे मराठीतील पारंपरिक/प्रचलित रूप म्हणून खपून जाईलही, मराठीत 'काश्मीर' अथवा हिंदीत 'बंबई' हे बहुधा तसेच खपून जात असावे, परंतु 'चितगांव' त्या निकषावर उतरू शकेल असे वाटत नाही; चूभूद्याघ्या.)

थोडक्यात, 'चट्टग्राम' असे लिहिल्यास उत्तमच, 'चिटगाँग' असे लिहिले तर आदर्शतः पटण्यासारखे नाही, पण एक वेळ चालवून/खपवून घेण्यासारखे आहे. पण 'चितगांव' हे कोणत्याही प्रकारे त्या शहराच्या नावाचे योग्य रूप वाटत नाही.

(शिवाय ढाक्याला डाक्का (की डाका) असे म्हटले जायचे असे अंधुकसे स्मरते. )

बरोबर. परंतु 'डाका' (Dacca) हे किमानपक्षी ढाक्याचे (अपभ्रष्ट का होईना, पण) तत्कालीन अधिकृत इंग्रजी रूप होते, अशी पळवाट घेण्यासारखी होती. (अर्थात, 'डाका'चे 'डाक्का' हे स्पेलिंगशः देवनागरीकरण तरीही चमत्कारिक होतेच; मात्र 'डाक्का' असेच रूप मराठी वृत्तपत्रांतून सर्रास दिसून यायचे, हा भाग आहेच. हे म्हणजे काहीसे मराठीत लिहिताना 'खडकी' असे मराठी रूप तर लिहायचे नाही, परंतु प्रचलित इंग्रजी अपभ्रष्ट-परंतु-अधिकृत रूप लिहिताना त्याचे स्पेलिंग आणि त्यानुसार योग्य उच्चार समजून न घेता 'कर्की'ऐवजी 'किरकी' असे लिहायचे, तशासारखे झाले.) पण 'चितगांव'करिता तीही (लंगडी?) सबब अथवा पळवाट आढळत नाही.