आपले इह लोकीचे काम संपल्यावर स्वामी निजधामास परत गेले.
निज या संस्कृतोद्भव शब्दातला नि हा ऱ्हस्व आहे. त्यातल्या ज चा उच्चार जल, बीज, जनसंपर्क यातल्या ज सारखा केला जातो.
नीज म्हणजे झोप या अर्थी असलेला शब्दातला नी दीर्घ आहे. त्यातला ज हा कोमल उच्चाराचा आहे. जवळी मजला, भाऊबीज, वजन यातल्या ज प्रमाणे.
कलोअ,
सुभाष