धन्यवाद महेशराव,
अगदी बरोबर लिहिले आहेत. मराठीमध्ये चितगाँग चा उल्लेख चितगांव असा केला जात असे. वर्तमानपत्रात असा उल्लेख विशेषतः १९७१ युद्धाच्या सुमारास वाचल्याचे मलाही आठवते.
चितगांव संग्रामातील एक वीर श्री. अनंत सिंग यांनी याच विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना श्री. वि. स. वाळिंबे यांनीही ('कथा ही दिवावादळाची' - प्रथमावृत्ती २०ऑक्टोबर १९६९) चितगांव असाच उल्लेख केला आहे.
श्री. वि. स. वाळिंबे यांच्याच ' सत्तावन्न ते सत्तेचाळीस' (प्रथमावृती १ जानेवारी १९९७) या ग्रंथातही चितगांव असाच उल्लेख आहे.