'चितगांव' हे त्या शहराच्या नावाचे मराठीतील पारंपरिक अथवा प्रचलित रूप वगैरे असण्याइतका त्या शहराचा वारंवार उल्लेख मराठीत होत अथवा कधीकाळी झाला असण्याबाबत साशंक आहे.

'चितगाव' असे त्या ठिकाणाचे नाव मराठीत रूढ झालेले आणि वर्तमानपत्रात विविध संदर्भात सर्रास वापरात दिसते.
जालावर मिळालेले हे काही वेचक नमुने पाहावे:

चितगाव (लोकसत्ता )
चितगाव किंग्ज (ईसकाळ)
चितगाव बंदर (गोमंतक)
चितगाव (ईसकाळ)
चितगाव (वेबदुनिया)
चितगाव (विकीपीडिया)
चितगाव न्यायालय (म.टा.)
'खेले हम जी जानसे' मधील चितगाव (म.टा.)

आणखीही उदाहरणे सापडतील.

महाराष्ट्रातही एक चितगाव आहे आणि तिथे पाच बांगलादेशी नागरिकांना अटक झालेली होती असे दिसते. जालावर शोध घेताना हेही सापडले :
(महाराष्ट्रातल्या) चितगावात बांगलादेशी (ईसकाळ)