पं. हृदयनाथ मंगेशकरांनी रोशन व सी. रामचंद्र मरण पावल्यावर जसा त्यांच्यावर अनावश्यक ताशेरा मारण्याचे अनौचित्य दाखवले  तसेच श्री.अरविंद गजेंद्रगडकर यांनी पं.कुमार गंधर्व  यांच्यावर प्रा.ना. सी. फडके यांचा ( दोघेहीही हयात नसताना) हवाला देत ताशेरा मारला होता. " मला उमजलेले बालगंधर्व " हा पं. कुमार गंधर्व यांनी सादर केलेला प्रयोग गजेंद्रगडकर यांना आवडला नव्हता पण तसे प्रत्यक्ष न म्हणता त्यानी ना. सी. फडके यांनी हा कार्यक्रम अगदीच भिकार होता असा शेरा मारल्याचा " अंतर्नाद" या मासिकातील लेखात उल्लेख केला‌ होता. त्यात कुमारजींच्या शब्दोच्चारावरही ताशेरे मारले होते. आता गजेंद्रगडकरही नाहीत पण अंतर्नादमधील त्यांचा लेख मात्र उरला आहे.