...बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू अशातशा तर मिळत नाहीत, त्यांच्या बदल्यात काहीतरी द्यावेच लागते, नाही का? तेव्हा त्या 'बदल्यातल्या काहीतरी'चे मोजमापही होत असलेच पाहिजे की. तेव्हा प्रश्न प्रस्तुतच आहे.
बाकी, वजना-मापांवरून आठवले. त्या अलीबाबाच्या गोष्टीत त्या 'बदल्यातल्या काहीतरी'चे मोजमाप अलीबाबाने तागडीने तोलून केले होते, असे आठवते. (त्या भानगडीत त्या बिचाऱ्या कासमला जीव गमवावा लागला होता, असेही काहीतरी आमच्या लहानपणी आमच्या आज्जीने - ईमृशांदे - सांगितले होते, पण ते जाऊ द्या.) म्हणजे वजनी परिमाण. आज हेच मोजमाप 'पेटी', 'खोका' वगैरे मापी परिमाणांत केले जात असल्याबाबत (सिनेमांतून वगैरे - म्हणजे हिंदी सिनेमांतून. मराठी सिनेमांत 'पेटी', 'खोका' वगैरे कोठून यायला? असो.) ऐकू येते. तर हे 'बदल्यातल्या काहीतरी'च्या मोजमापाचे वजनी परिमाणांतून मापी परिमाणांत संक्रमण नेमके कधी झाले असावे बरे? की हा देशोदेशीच्या स्थानिक रीतीभातींचा/सांस्कृतिक फरक समजावा?