ज्या दिवशी हर्षद मेहताने नरसिंहरावांना पेटी पाठवली त्या दिवसापासून वजनी परिमाण मापीत बदलले गेले असे वाटते. पण लक्षात घ्या, हर्षद मेहताने पाठवलेल्या पेटीला तेव्हा सुटकेस म्हणत.
पण मला आठवते त्याप्रमाणे, अलीबाबा माल मापाने मोजत होता, तागडीने नव्हे. म्हणूनच मापाच्या तळाशी असलेल्या मेणाच्या ठिपक्याला माल चिकटला आहे हे त्याला समजले नाही, आणि त्यामुळे अंती त्याच्या मोठ्या भावाला प्राण गमवावे लागले. पण मुद्दा लक्षात आला. भारतात जरी काही गोष्टी मापाने मोजणे बहुधा हल्लीहल्ली सुरू झाले असले तरी, अलीबाबाच्या काळात ती पद्धत अरबस्तानात आधीच होती.
मोहरमच्या आदल्या दिवशी काही इसम रस्त्याने छाती बडवत 'या हसन, या हुसेन' असे म्हणत मिरवणुकीने जात होते. भारतभेटीवर आलेल्या एका अरबी माणसाला तो आक्रोश पाहून नवल वाटले. त्याने कारण विचारले. कारण समजल्यावर तो उद्गारला," या अल्ला, ती बातमी इथे आत्ता पोचली?" तेव्हा अरबस्तानात असलेली मापाने 'माल' मोजायची पद्धत भारतात आत्ताआत्ता पोहोचली असल्यास आश्चर्य नाही.