पूर्वी कधीतरी शंका, अनिश्चिती ह्या अर्थाने तथा हा शब्द वाचनात आला होता. कोठे ते आता आठवत नाही, पण कोणत्या तरी पुस्तकात होता, जालावर नव्हे. नेहमीच्या अर्थाने घेता वाक्याचा अर्थ लागत नव्हता. शब्दकोशात शोधल्यावर उलगडा झाला. तेव्हापासून हा वेगळा अर्थ मनात घर करून होता. ह्या रचनेत काफिया म्हणून बसत होता, त्यामुळे वापरला.