ना‌.  सी.  फडके कलाक्षेत्रातील जाणकार होते. त्यांनी सुरश्री केसरबाई केरकर तसेच दक्षिणेकडील नृत्यप्रकार यावर  अतिशय मार्मिक  लेख लिहिले आहेत व त्यातून त्यांची संगीत व नृत्य यातील जाणकारी प्रकट होते. झंकार नावाचे नियतकालिक ते चालवीत व त्यात अनेक रसग्रहणात्मक लेख असत.