कटाक्षांना चुकवणे शक्य होते पण
जगी घायाळ होण्याची प्रथा आहे
कुणावर आळ घेऊ स्वप्नभंगाचा?
सभोवारी स्वकीयांचा जथा आहे
मनीषांनी कसे चौखूर उधळावे?
सवय चिखलात रुतण्याची रथा आहे
पुराणातील वांगी शोभते तेथे
खलांची हार ही भाकडकथा आहे
---- जगी घायाळ होण्याची प्रथा आहेच तर या शेरांवर घायाळ!
जयंता५२