समीक्षकापैकी एकाद्याला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळणे ही गोष्ट अन्यायकारक आहे या

कुशाग्र यांच्या मताशी पूर्ण सहमत. साहित्यिक त्यांच्या सृजनशीलतेतून लिखाण करतात म्हणून समिक्षक निर्माण होतात.

असे असले तरी साहित्यकृतीचे सौदर्य वा कुरुपता दाखवून देऊन काय चांगले आणि काय वाईट हे सामान्य वाचकांना ठरवता यावे यासाठी अत्यंत मर्यादित मदत ते करतात त्यामुळे तेही साहित्याची थोडीफार सेवा करतात असे म्हणायला हरकत नाही. पण अध्यक्षपद भूषवण्यास ते पुरेसे असू नये असेच माझेही म्हणणे आहे.