शुक्रिया वरून आठवले.

माझा मुलगा अगदी लहान होता तेव्हा सारखी सारखी दुपटी लंगोट बदलायला लागायचे. कधी कधी तर लंगोट बदलला रे बदलला की पुढचा लंगोट लागायचा
मी आणि माझ्या सासुबाई अगदी वैतागून जायच्या.
त्याच वेळी टीव्हीवर बहोत शुक्रिया गाणे लागले. त्यावर सासूबाई म्हणाल्या "शी नको ग बाई बहोत शुक्रिया"

तेव्हापासून तो शब्द ऐकला की आम्हाला तो प्रसंग आठवतो आणि हसल्यावाचून राहवत नाही.

असो.
तुमची कविता मात्र मस्त अहे.
संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे
ह्या ओळी खूप आवडल्या.