"प्रचिती आणि प्रतीती दोन्ही शब्द वेगळे आहेत." कबूल, पण अर्थही वेगळे आहेत?  मूळ संस्कृत प्रतीति, मराठीत लिहिताना प्रतीती.  शब्दकोशातील अर्थ प्रतीति=प्रचिती किंवा प्रचीती, अनुभव, अनुभूती, प्रत्यय, प्रत्यंतर, पडताळा, साक्षात्कार वगैरे.

प्रचितीच्या अर्थामध्ये 'अनुभवा'च्या सर्व छटा येत नाहीत, हे उघड आहे. एखाद्याला राजकारणाचा दांडगा अनुभव असला  तरी त्याला राजकारणाची दांडगी प्रचिती आहे असे म्हणता येत नाही.

भाषेतील कोणतेही दोन वेगळे दिसणारे शब्द अगदी तंतोतंत एकाच अर्थाचे असणे ही गोष्ट फार दुर्मीळ आहे.