कदाचित् ललित साहित्याच्या बाबतीत असे प्रश्न पडणार नाहीत. एखाद्या ललित लेखकाने तळ्याकाठी अनुभवलेल्या काही निवांत क्षणांवर लेख लिहिला आणि त्यात किंचित कल्पनेचे रंग मिसळले तर त्याची तपासणी करायला कोणीही जात नसावे. समजा, लेखकाने लिहिले, सायंकाळी तळे जांभळे नारिंगी भासते. वाचक त्याला विचारत नसावा की, सायंकाळी तळे जांभळे भासते याचा पुरावा द्या.
ललित आणि अललित लेखनातील हा फरक असावा.
मात्र, बागकाम विषयावरील पुस्तकात समजा एखादे सूत्र असे आहे, बंगल्याच्या फाटकाजवळ लावायच्या रोपांमध्ये गुलाबाला प्राधान्य द्यावे. ते सुंदर दिसते. लेखकाला किती वाचक विचारायला जात असतील की, तुम्ही तुमच्या बागेत हे केले आहे का ?
मुळात, या गोष्टींची तपासणी करावी असे किती जणांना वाटते ?