आपला प्रतिसाद वाचून मला खूप आनंद झाला. पण मी मेंदूलहरी व मनोवृत्ती ह्यांचा संबंध दाखविला; मेंदू व संगणक ह्यांचा नाही. मी काही संदिग्ध लिहीले असेल तर मला माफ करा. मी मराठी जालावर नुकतीच येऊ लागले आहे. तेव्हा माझ्या काही चूका होत असतील तर त्याही सांगा. रेकी हा विषय सर्वस्पर्शी असल्यामुळे तो किती व्यापक लिहायचा आणि किती संक्षिप्त करायचा ह्याबद्दल संभ्रम उडतो. पण आपल्या प्रतिसादामुळे लेखनाला प्रोत्साहन मिळते. त्याबद्दल धन्यवाद.