समिक्षकांमुळे जर साहित्याचा वेगळा प्रकार निर्माण होणार असेल , तर काहीच हरकत नाही. तसंही एखाद्या साहित्यकृतीचे मूल्यमापन कसं
करावं हे सर्वसाधारण वाचकाला माहित असणं कठीण आहे.  त्याला साधारणपणे स्वतःच्या जीवनातलं प्रतिबिंब दिसलं म्हणजे तो खूष असतो. नाहीतर त्याच्या दृष्टीने साहित्य कमी प्रतीचे ठरते. अशा वेळी समिक्षक चांगली भूमिका बजावू शकतात. साहित्याचे ऍप्रिसिएशन (म्हणजे आस्वाद किंवा रसग्रहण हा अर्थ असावा. कारण असल्या अप्रिसिएशनचे कोर्सेस आहेत असं मी ऐकलं आहे. उदा. म्युझिक अप्रिसिएशन हा कोर्स असल्याचे माझ्या वाचनात आहे) कसं करावं हे समजायला मदत होत असावी. अर्थातच समिक्षात्मक साहित्य   हे काही सृजनशील  साहित्य म्हणता येत नाही. तर ते आधारभूत साहित्य ठरू शकेल. थोडक्यात समिक्षक साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष असणं किंवा नसणं  हे फारसं महत्त्वाच वाटत नाही. ही माझी मतं आहेत. कदाचित पटणार नाहीत.