कदाचित आपल्याला एखाद्या व्यक्तिने निरपेक्ष बौद्धिक मैत्रीचा पर्याय दिला असेल व आपण मला मिलनच हवे म्हणून मैत्रीला नकार दिला असेल. कदाचित ती व्यक्ती उच्चविद्याविभूषित असेल व आपल्या मनस्थितीची तिला काळजी वाटत राहिली असेल. कदाचित ती व्यक्ती अमराठी वातावरणात अधिकारीपदावर अनेक वर्षे काम करत असेल, म्हणून व्यक्तीव्यक्तीमधील निरपेक्ष नाते तिला अजिबात नवीन नसेल व मग आपला प्रस्ताव तिला चमत्कारिक वाटला असेल. कदाचित ती व्यक्ती मधून मधून परदेशात रहात असेल व म्हणून आपण "काकस्पर्श" च्या जमान्यात आहात, असे तिला वाटले असेल. कदाचित त्या व्यक्तिचा जोडीदारही तितक्याच प्रगल्भ मनाचा असेल व त्याचेही  मित्र बनू शकाल. कदाचित ते परदेशस्थ जोडपे आपल्याला समस्येवर मधुर उत्तर शोधून देऊ शकेल. कदाचित आत्ता आपली मनस्थिती त्या व्यक्तीला भेटण्याची नसेल, तर नका भेटूः मग जेव्हा आपले मन शान्त होईल, तेव्हा त्या व्यक्तीला नक्की भेटा. कदाचित त्या व्यक्तीची जीवनकहाणी ऐकून, आपण किती सुखात आहोत, असे आपल्याला वाटू शकेल. कदाचित अशी व्यक्ती आपल्या जीवनात आलीच नसेल, तर मग हा प्रतिसाद खुल्या मनाने विसरून जा व ह्या प्रतिसादाबद्दल, ह्या "छोटी बहन"ला माफ करा.