"शुद्ध जाणीव" आणि "निराकार" यांत फरक काय ? कि दोन्ही एकच
मध्ये एकदा तुम्ही लिहिलं होतं कि
>> शारीरिक दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे जाणीवेचा सर्व प्रवास नाभी (साधारण
ओटीपोटाच्या मध्यभागी असलेला बिंदू) ते सहस्त्रार (टॉप ऑफ द हेड) आणि मग
आकाश असा आहे.
आणि
>> जाणीव निराकार आणि असीम आहे ..
मग हा जाणिवेचा "प्रवास" म्हणजे नेमकं काय ? सगळं जगच जर जाणीवेनी बनलयं, तर जाणीव जाउन जाणार कुठे ? नीट समजलं नाही.