विकिपिडियावरील माहिती :
"गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे.
स्वरूप
गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने अध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते.
ही गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते.
गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते. "
"गवळण - पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण
सादर करण्याची प्रथा आहे. ही गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या
शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण
सादरीकरणामागे निखळ मनोरंजन ही एकमेव भावना असल्याचे दिसते. नाट्य व
काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कार करते. "
-डॉ. प्रकाश खांडगे, महान्यूज