दादामुनींबद्दल इतका छान लेख कधीच वाचला नव्हता.
तुम्ही लिहिल्याप्रमाणेच बंदिनी मधली नूतन म्हणते की "उनकी हंसी बडी अनोखी है".
असे ऐकले आहे की चित्रपटात कितीही मोठा नायक असला तरी "अशोक कुमार" या नावाचा मान सगळ्यात पहिला असे.
मिली, शौकीन, छोटीसी बात, बंदिनी, कानून, चित्रलेखा अशा सिनेमातला त्यांचा अकृत्रिम अभिनय आम्हाला फार आवडतो. (फक्त "क्लर्क"चा सन्माननीय अपवाद वगळावा - पण मनोजभाउंचा "क्लर्क" हा एक स्वतंत्रच विषय आहे
)
सुंदर लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!