शास्त्रीय माहिती कितपत समजू शकते याविषयी मनोगतींचा अभिप्राय अपेक्षित आहे.
विषय सर्वसामान्य व्यवहारातील अनुभवांपलीकडचा असल्यामुळे निर्विवादपणे क्लिष्ट आहे. माझ्या मते सापेक्षता, अवकाशाची वक्रता, काल आणि अवकाश यांची गुंतागुंत ज्यांना ठीक समजली आहे तेच वाचक हे नीट समजू शकतील. इतरांना तुमच्या नेहमींच्या खुसखुशीत, मनोरंजक शैलीत टिपण्या करून, आणखी उदाहरणे देऊन खुलवून सांगणे गरजेचे आहे. एक वाक्य समजले नाही तरी पुढील माहिती समजण्याचा डोलारा कोसळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग वाचले तरी समजणार नाही. समजले नाहीर तर सामान्य वाचक बहुधा आणखी पुढे जाणार नाही. फक्त संशोधन क्षेत्रातलीझ व्यक्ती पुन्हा पुन्हा वाचून समजून घेईल.
असो. मला मात्र सर्व लेख आवडले. जॉर्ज गॅमॉव्हचे एक पुस्तक मी (मराठी) शाळेत असतांना वीरकरांचा शब्दकोष घेऊन दोनतीन आअठवडे वाचत होतो, नाही वाचण्याचा प्रयत्न करीत होतो ते आठवले आणि हसू आले. माझ्या रोखठोक भाषेबद्दल क्षमस्व.