सर्वच प्रकारच्या भाषांतरासाठी मनोगतावर सदस्य आणि प्रशासनाकडून विविध प्रकारचे प्रोत्साहन आणि साहाय्य वेळोवेळी मिळत असते.
कवितांचे भाषांतर मनोगतावर सादर करताना ते वृत्तात असण्याची आवश्यकता ठेवलेली आहे. (मूळ रचना वृत्तात असो वा नसो)
भाषांतर जर मूळ रचनेच्या चालीत/वृतात नसेल तर आपल्या भाषांतराचे वृत्त सांगता यायला हवे.
मूळ रचनेत जेथे जेथे यमके असतील तेथे तेथे भाषांतरात यमके आली तर चांगले वाटते.
कृपया सहकार्य करावे.