आता सांगा बरे कसे ओळखलेत गाणे? कुठल्या ओळीवरून ओळखलेत?
निश्चित सांगणे कठीण आहे. पण बहुधा,
छळ का असा
करता राजसा?
कोमल मी फार जणू काय जुई-जाई २।१।
या ओळींतील लयीवरून डोक्यात काहीतरी चमकून गेले, असे म्हणायला जागा आहे.
बाकी, 'छुईमुई' आणि 'जुई-जाई' यमक मस्तच आहे. पण तरीही... 'जुई-जाईसारखी नाजूक' असे कधी कोणी कोणाला म्हटल्यासारखे आठवत नाही. तसेही 'जाईजुई' असा क्रम प्रचलित आहे. तेव्हा हे 'छुईमुई'साठी काहीतरी जमवलेले आहे हे ओळखायला वस्तुतः कठीण जाऊ नये. तेव्हा ती 'छुईमुई', आणि अगोदर म्हटल्याप्रमाणे ती लय... बऱ्यापैकी निर्देशक ठरावी असे वाटते.