सगळ्याच कवितांची प्रतिक्रिया बाहेर दिलीच पाहिजे असं नाही तर काही वेळा देता येतही नाही. असे कितीक जुने व  नवीन कवी आहेत ज्यांची काव्य मनाला स्पर्शून जातात. आपली दाद ऐकायला कवी हजर नसतात. तसच एखादं साहित्य आपल्याला अतिशय आवडलेलं असतं , फार तर आपण त्याची फर्माईश दुसऱ्यांकडे करतो किंवा त्याची पारायणंही करतो, तर कधी कधी काही साहित्य आपल्याला मार्गदर्शकही ठरतं. साधारणपणे सामान्य वाचकाच्या प्रतिक्रीयेला कोणीही विचारीत नाही. एखादा समिक्षकही त्याच्यासारखीच प्रतिक्रिया व्यक्त करतो, पण तो समिक्षक असल्यामुळे त्याला महत्त्व असतं, इतकच. काही झालं तरी हल्ली मनोगतांसारख्या साईटस असल्यामुळे निदान आपली  प्रतिक्रिया कवी अथवा लेखकापर्यंत पोचवता तरी येते. हेही नसे थोडके.