मी स्वतः प्रतिभावान कवी नाही. आणि कविता लिहिण्याचा माझा अनुभव फार मर्यादित आहे; पण ...

कधी एखाद्या कविचं नावंच असं मोहिनी घालणारं असतं की ती कविता सगळ्यात आधी वाचायला घेतली जाते.

असे झालेले एखाद्या प्रतिभावंत कविला आवडेल असे वाटत नाही. आपल्या कवितेकडे वाचकाचे लक्ष जायला हवे. (आपल्याकडे नको! ) रसग्रहण, आस्वाद, टीका जे काय व्हायचे ते कवितेचे व्हायला हवे (आपले नको! ) असेच एखाद्या प्रतिभावंत कवीला वाटत असणार असा माझा कयास आहे.

नुसते कवितेच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत असेच होत असावे असे वाटते. उदा. एशियन पेंटसच्या बोधचिन्हासाठी जेव्हा प्रवेशिका मागवल्या गेल्या होत्या तेव्हा आर के लक्ष्मणांनी वेगळ्या नावाने प्रवेशिका पाठवली होती (असे ऐकल्यासारखे वाटते). हेतू  हा, की चित्राचे चित्र म्हणून मूल्यमापन व्हावे. (तपशीलाबद्दल चू. भू. द्या. घ्या.)