चांगला लेख. सामान्य माणसापुढे (म्हणजे साधारण स्वार्थ साधणारे, माझ्या मते हं! ) अशा बऱ्याच कसोट्या उभ्या असतात. आजकाल
बरेच "डे" असतात(म्हणजे, फादर्स डे, मदर्स डे सारखे) सामान्य माणसाचा दिवस का साजरा होत नाही ? "कॉमन मॅन्स डे" साजरा व्हायला
हवा. त्या दिवशी शक्या असेल ते चांगलं नशीब त्याच्यापुढे आणून ठेवावं. हे काम तथाकथित "जागरूक नागरीकांनी करायला हरकत नाही.
अर्थात, हे विषयांतर वाटेल आणि यावर तपशीलात लिहिण्याची ही जागाही नाही. पण सहज वाटलं म्हणून लिहिलं. या दिवशी रिक्षा पाहिजे तिथे
यायला तयार होणं, लोकलमध्ये भर गर्दीत जागा मिळणं , समोरच्या माणसानं आपली लायकी न दाखवणं , कोणताही दंड भरायला न लागणं, ऑफिसमध्ये सायबाने आपला टॅलेंट नावाजणं, अशा बऱ्याच लाचारी सिद्ध करणाऱ्या जागा आहेत. असो. लेख चांगलाच आहे. एका महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे. माझाही हा अनुभव आहे. मी ज्या रिक्षात बसलो होतो, त्याच्यापुडच्या वाहन चालकांना पिवळा सिग्नल असताना पकडलं नाही आणि यालाच पकडलं. सकाळी उठून कोणाच तोंड पाहिलं , असं वाटावं असे हे अनुभव असतात.