ऑर्थर ऍश या प्रख्यात टेनिस विजेत्याला एडस सारखा भयानक रोग झाला त्यावेळी त्याला विचारण्यात आले, "देवाने अशा भयंकर रोग होण्यासाठी तुलाच का निवडले ? "त्याने उत्तर दिले, "असे पहा,५ कोटी मुले जण टेनिस खेळायला सुरवात करतात, त्यातील ५० लाख खेळायला शिकतात, त्यातील ५लाख धंदेवाइक खेळाडू बनण्याचा प्रयत्न करतात,त्यातील ५०,००० यशस्वी होतात,त्यातील ५,००० महत्वाच्या मॅचेस जिंकतात, त्यातील ५० विंबल्डनला पोचतात, ८ उपांत्यपूर्व फेरीत पोचतात,४ उपांत्य फेरीत पोचतात आणि २ अंतीम फेरीत पोचतात, असे असून मला विजेतेपद मिळाल्यावर चषक उंचावताना देवाला "मीच का" असे विचारावेसे वाटले नाही मग आत्ताच कशाला "मीच का? " असे विचारू? '
क्षुल्लक गोष्टीतही मीच का असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायला काय हरकत आहे ?