वगळणे या शब्दातून 'काढून टाकणे' या अर्थापेक्षा 'समावेश न करणे' असा नकारार्थी अर्थ (मला) अधिक जाणवतो.  वगळणे हा थोडासा इंग्लिश 'एक्स्क्लूड' च्या जवळपास जातो. तसे मज्जाव करणे, अटकाव करणे हेही शब्द आहेतच. पश्चात्बुद्धीने 'प्रीवेंट' या शब्दाचा मराठी प्रतिशब्द योग्य झाला असता असे वाटते. 'कटाप करणे' हा इंग्लिश 'कट ऑफ़' वरून आलेला शब्दही आता मराठीत बऱ्यापैकी रूढ झाला आहे.