प्रवासवर्णन व छायाचित्रे आवडली. यंदाच्या तुमच्या वारीत भेटीचा योग नव्हता, पुढच्या वेळी नक्की.
परतीच्या प्रवासात मुंबई विमानतळावर आलो तर गर्दी पाहून जीव कोंडला गेला. घामाच्या नुसत्या धारा नाहीत तर चक्क घामाची अंघोळ! तसेही पुण्यातून रस्त्याने चालताना किंवा रिक्शातूनही जाताना गर्दी पाहून जीव घुसमटतो. मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याशी बोलून डोके भणभणायला लागते. असे वाटते की बोलण्यातून व गर्दीतून जाताना किती प्रमाणात ताकद निघून जाते ...या सर्व गोष्टी आता खूप त्रासदायक वाटतात.