पेसं
नुरेको
साडे
लोणे
सुं


- 'अनवट' म्हणजे 'पायातली अंगठी ', किंवा 'कडेलोट'चा अर्थ 'न्यूनतम पातळी' असा(ही) होतो, याची कल्पना नव्हती. ते या निमित्ताने कळले, आणि मोल्सवर्थभटाकडून* त्याचा सोक्षमोक्ष लावून घेतला.

- हल्ली एवढ्यात 'अनवट' हा शब्द काहीसा 'अन्कन्वेन्शनल' किंवा 'चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळे' अशा अर्थी वापरलेला ऐकलेला/वाचलेला आहे. (उदा. एखादा अनवट राग, किंवा एखादी अनवट पाककृती, वगैरे. ) मोल्सवर्थभट या शब्दाच्या या अशा अर्थाने वापराबद्दल काहीच म्हणत नाही. तर मग अशा अर्थाने या शब्दाच्या अशा वापराचा उगम कोठून आणि कधीचा असावा?


* किंवा मोल्सवर्थसाहेब,  किंवा जनाब मोल्सवर्थमियाँ, किंवा छत्रपती श्री. मोल्सवर्थ महाराज, किंवा शणै मोल्सवर्थबाब, जे काही हवे ते. त्यावरून वाद नको. थोडक्यात, जेम्स थॉमस मोल्सवर्थ, एस्क्वायर, आद्य मराठी शब्दकोशकर्ता. असो.