चर्चा प्रस्ताव त्रासदायक नसून त्यापेक्षा त्याची मांडणी अतिशय गलथान आणि भरकटवणारी आहे. जालावर येणारी माणसे दूधखुळी नाहीत. इथे असणारे संभाव्य धोके त्यांना माहिती आहेत, ते मनात ठेऊन इंटरनेटवर वावर कसा करावा वा करायचा असतो हे आता नव्याने सांगायला नको.
मूळ मुद्दा स्पष्ट मांडला असता तर नेमका प्रस्ताव काय ते कळायला एवढा वेळ गेला नसता. संकेतस्थळाची नावे, व्यक्तींची नावे घेण्याचे प्रयोजन कळले नाही. ड्रुपलवर आधारित सर्व स्थळांवरची सुरक्षितता हा चर्चाप्रस्ताव मला योग्य वाटतो.
हॅकिंक झाले तर कोणते मराठी संकेतस्थळ त्याची जबाबदारी घेणार नाही हे स्पष्ट आहे,प्रॅक्टीकल आहे.
मिलिंद फणसे यांच्याशी सहमत. तुमच्या दुसऱ्या प्रतिसादाबद्दल- पुनरुज्जिवित केला आहे धागा ?.. नाही. स्त्रीमुक्तीदिनानंतर आता नवा खेळ आणि नवा खेळाडू!
इथे मनोगतावर लेखन करतांना आपण सर्व अटी मान्य केल्या आहेत.
कशाची रिंगिग बेल..कशाचे काय!
ऋषिकेश,
ही घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे
१. शक्य आहे
२. शक्य आहे.
३. माहिती नाही.
४. मला असे बिलकूल वाटत नाही. इतका एकोपा मराठी माणसांच्या तब्येतीला हानीकारक ठरू शकतोः)
सोनाली