कोठल्याही यंत्रणेत सुरक्षिततेच्या आणि दक्षतेचे पेचप्रसंग असतातच. पुष्कळ ठिकाणी हा चोर-शिपायाच्या खेळासारखा प्रकार असतो. शिपाई हुशार झाले की चोर हुशार होतात आणि चोर हुशार झाले की शिपाई हुशार होतात.
सुरक्षेचे आणि दक्षतेचे व्यवसाय करणारे तज्ज्ञ लोक त्या त्या क्षेत्रात असतात. त्यांचा एक अगदी महत्त्वाचा प्रघात असा आहे की दक्षतेच्या समस्या आणि उपाय हे चव्हाट्यावर चर्चा करण्यासाठी नसतात. अशा चर्चा किंवा माहितीची देवाण घेवाण अगदी काळजीपूर्वक केली जाते.
अर्थात वय / समज आणि एकंदर परिपक्वता जसजशी वाढेल तसतसे हे तारतम्य येईल असा विश्वास वाटतो.
शुभेच्छा
-श्री. सर (दोन्ही)