आइस्क्रीम हा शब्दही मराठी झाला आहे.
एखादा शब्द मराठी झालेला दिसला की (किंवा तो तसा झालेला आहे असे नुसते कुणी मला सांगतले तरी) मला अiतिशय आनंद होतो.
पण शब्द मराठी 'झाला' असल्याचे गमक काय?
शब्द आपल्या भाषेत 'येऊन' नुसता दिवाणखान्यात कोचावर बसण्यापेक्षा किंवा शोकेसमध्ये ठेवला जाण्यापेक्षा तो भाषेच्या घराच्या नियमाप्रमाणे कपडे बदलून इतर घर गृहस्थीच्या कामात इतर शब्दांप्रमाणे भाग घेऊ लागला तर तो खरोखरच मराठी 'झाला' असे म्हणता येईल.
आईसक्रीम ह्या शब्दाबद्दल असे व्हायला अधिक वाट पाहायला लागेल असे वाटते, अर्थात इतरभाषिक शब्द आपलेसे करण्याबाबत माझा दृष्टिकोन 'बेरजेचा' आहे हे मी आही इतरत्रही लिहिलेले आहे.