नुसत्या यू ट्यूबसाठी जावास्क्रिप्टला मुभा द्यावी लागत असेल तर ते टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी वेगळा फिल्टर तयार करून त्याची कल्पना वापरकर्त्याला द्यावी. आणि त्या फिल्टरमध्ये त्याने लिहिलेला मजकूर सर्व्हरवर बदलून त्याजागी यू ट्यूब चा मजकूर लिहावा. म्हणजे वापरकर्त्या कडून वापरकर्त्याकडे जावास्क्रिप्ट थेट जाण्याची शक्यता राहणार नाही.
(आणि हो, जावास्क्रिप्टची मुभा काढून घ्यावी!! )
पीएचपी, ड्रुपल, जावास्क्रिप्ट हे येणाऱ्या कुणालाही थोड्या प्रयत्नांनी ही सुधारणा शक्य होईल असे वाटते.
ड्रुपलच्या फिल्टर मॉड्यूलचा अभ्यास करावा.